Suvarnprashan - Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content
सुवर्णप्राशन संस्कार योजना
सुवर्णप्राशन म्हणजे काय ?
भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये बाळाला जन्मानंतर सोने चाटवण्याची परंपरा आहे. याचे वर्णन आयुर्वेद शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी आलेले आहे. लहान बाळाला शुभ दिवस पाहून तूप, मध व सोने ( सुवर्ण ) यांचे चाटण देणे म्हणजे  सुवर्णप्राशन  होय.
सुवर्णप्राशन आजच्या काळात कशासाठी  ?
आजच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक दांपत्याला १ किंवा २ अपत्येच हवी असतात. अशा परिस्थितीत आपले अपत्य सुदृढ, निरोगी व बुद्धिवान असावे असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविकच आहे. तसेच देशाचा उत्कर्ष  येणाऱ्या पिढीवर अवलंबून असतो. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी येणारी पिढी ही निरोगी, सुदृढ, कर्तृत्ववान, हुशार व सर्वगुणसंपन्न असणे आवश्यक आहे. तसेच वरचे वर वाढत जाणारे प्रदूषण, अन्नधान्य उत्पादनासाठी वापण्यात येणारी रासायनिक खते, कीटकनाशके व कामातील ताणतणाव इत्यादीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत आहेत.                                   
परिणाम स्वरुप आयुष्यमान हे निकृष्ट व कमी होत आहे. यासाठीच सुवर्णप्राशन हा उपक्रम आजच्या काळात अत्यंत उपुयक्त व आवश्यक आहे.
सुवर्णप्राशन कोणत्या वयोगटातील मुलांना देतात  ?
सुवर्णप्राशन जन्माला आल्यानंतर लगेचच सुरु करावे. बाळाच्या वयाच्या वर्षापर्यंत रोज द्यावे.
सुवर्णप्राशन करण्याचा विधी व डोस कसा असतो ?
शुभ दिवस म्हणजे पुष्य नक्षत्र असते त्या वेळी सुरुवात करुन त्यानंतर दररोज नियमितपणे सुवर्णप्राशनचा डोस देणे आवश्यक असते. वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत नियमितपणे सुवर्णप्राशनचा डोस द्यावा. वयाच्या ५ वर्षापर्यंत मेंदूची वाढ अति जलद होत असते. मेंदूची वाढीबरोबर जर मेध्य औषधे सेवन केली तर रोगप्रतिकार शक्ती वाढते, बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती व स्मृती वाढते.
सुवर्णप्राशनचा डोस वयानुसार, वजनानुसार बदलता असतो.

बाळाच्या वयाच्या ५ व्या वर्षापर्यंत दररोज नियमितपणे सुवर्णप्राशनच्या सेवनाबरोबरच प्रत्येक पुष्य नक्षत्राच्या दिवशी जादाचा सुवर्णप्राशनचा डोस ( बुस्टर डोस ) देणे आवश्यक असते.
सुवर्णप्राशन केल्याने मुलांना मिळणारे फायदे :
रोगप्रतिकार शक्ती वाढते व पचनशक्ती सुधारते.
बौद्धिक क्षमता, आकलन शक्ती व स्मृती वाढते.
मनाची एकाग्रता वाढून अभ्यासात लक्ष्य केंद्रित होते.
वाणी मध्ये माधुर्य येऊन शब्द स्पष्टता वाढते.
शारिरीक व मानसिक बल वाढते.
त्वचा नितळ होऊन कांती वाढते.
ऋतुपरत्वे निर्माण होण्याऱ्या विविध ( अॅलर्जी ) रोगांपासून संरक्षण मिळते.
हवेत प्रदुषणामुळे होणाऱ्या विविध श्वसन विकारांविरुद्ध प्रतिकारक्षमता वाढते.
आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या निकृष्ट आहार व रासायनिक खतांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मदत होते.

डॉ. गणपत्ये यांच्या श्री धन्वंतरी हॉस्पिटल, माणगांव येथे, पुष्य नक्षत्र असते त्या दिवशी
सुवर्णप्राशनाचा अतिरिक्त डोस - बुस्टर डोस मोफत दिला जातो.
रोजच्या वापरा करिता देण्यात येणारे सुवर्णप्राश हे औषध उपलब्ध आहे. ( 02362 – 236102 ).
वेळ – पुष्य नक्षत्रा दिवशी श्री धन्वंतरी हॉस्पिटल, माणगांव ( ढोलकरवाडी ) येथे  सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content