About - Dhanvantari Hospital Mangaon Sawantwadi Kudal Konkan

Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Shree Dhanvantari Hospital
Ph : (02362) 236236, 236102, 236436.
Ph : (02362) 236236, 236102.
Go to content

ABOUT US
We are committed to provide women with the highest quality and most advanced health care for all stages of their lives, from early childhood to an adolescence age and throughout the child bearing age to  menopause and beyond. Nothing is more important to us than a patient's well-being and quality of life. We strive to provide excellent service distinguished by compassion, quality, and safety.

We provide investigative, treatment and emergency services for a whole range of obstetric and gynaecological conditions  providing our patients and their families with the support they need during their period of illness and recovery.  Our approach towards the patients is to feel them healthy and happy from within outwards. We believe on therapeutic as well as prophylactic approach while treating the patient. We work hard to ensure that our patients have the compassionate and personalized approach they deserve. To treat the patients initially with medicines and shift them earliest towards  the healthy lifestyle is our unique style of practice. For our patients, we carry out separate sessions of dietetic consulting according to the diseases. We also conduct individual exercise workshops and train the patients to achieve their fitness goals.

We have indoor facility for Normal, Vaccum and Caeserian delivery. We offer a special Ayurvedic Basti treatment for the pregnant patients to enhance the chances of normal delivery. We conduct Garbhsanskar workshops and Exercise workshops for the pregnant patients. We guide  the patients for healthy pregnancy diets and small tips to be free from diseases during pregnancy.
चारोळ्या

लिखाण हा उत्स्फूर्ततेचा उत्कट अविष्कार आहे. एखादी गोष्ट / अनुभव रंगवून, खुलवून सविस्तरपणे लिहिण्यात जेवढी मजा आहे, तेवढीच मजा चार ओळींच्या “चारोळीत” आहे. कॉलेजमध्ये असताना चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या वाचनात आल्या. अक्षरश: वेडे व्हायचो आम्ही त्या चारोळ्या वाचून. प्रसंग छोटासाच, शब्दही मोजकेच; पण अर्थ किती खोल. कसं सुचतं यांना? असा प्रश्न सारखा पडायचा. अनेक पारायणं झाली त्यांच्या 'मी माझा' या पुस्तकाची. पण त्यानंतर आजूबाजूचे अनेक प्रसंग जिवंत झाले. छोटे छोटे अनुभव टिपावेसे / शब्दबद्ध करावेसे वाटले. नाव सुद्धा कित्ती छान ना. “चारोळी”... कोजागिरीच्या रात्री दुधातल्या चारोळीला एक वेगळेच स्थान आहे, दुधाची चवच नाही, तर दुधाचे सौंदर्य खुलवण्याची कला आहे त्या चारोळीत, तसंच कविता प्रकारात चारोळीला स्वत:चे असे एक विशेष स्थान आहे. या अशाच कधीतरी सुचलेल्या काही चारोळ्या...
चुकांवर पांघरूण घालायला
नको आणूस रे महागडी gifts,
डोळ्यात डोळे मिसळून फक्त
एकदा म्हण "चुकलो मी" !
प्रत्येक वेळी डोक्याने वागायला
जमलंच नाही मला,
म्हणूनच यश कमी आणि
सुख जास्त पदरात पडलं माझ्या.
पूर्ण मोकळीक आहे
तुला तुझी priority ठरवण्याची,
 सवय झालीये मला
माझा नंबर वर खाली होण्याची.
माझ्या लिखाणाचा अर्थ
लावण्याची घाई करू नकोस,
तुझ्या मनातली भावना
त्यात शोधायला जाऊ नकोस.
मनवतोस तू छान म्हणून
चिडण्यात माझ्या मजा आहे,
त्या नंतर गच्च मिठीची
एक गोड सजा आहे.
तुझ्या डोळ्यावरचा
रंगीत goggle काढ आधी,
कोणत्या नजरेने बघतोस
ते तपासायचंय मला.
बाहेर राहणारी मुलं
घरात पाहुण्यासारखी वागतात,
फॅनच्या बटणासाठी चाचपडताना पाहून
डोळ्याच्या कडा ओलावतात
सगळ्याच जखमांवर मलमपट्टी
करायची नसते रे,
काही जखमांवर आपुलकीची
फुंकर मारून तरी बघ
प्रत्येकाच्या मनात
एक अथांग समुद्र असतो,
काही लाटाच फक्त
किनार्‍यापर्यन्त पोचतात
नुसत्या तुझ्या आठवणीनेच
डोळे भरून येतात,
तुझा फोटो भिंतीवर टांगण्याची
हिम्मत नाही माझ्यात
चार कप्प्यांच्या हृदयामध्ये
पाचवा चोर कप्पा असतो,
दिसू नये कोणाला म्हणून
जमेल तसा लपवत असतो
पिल्लांना पोटाशी धरुन
त्यांची पोटं भरता येत नाहीत,
पिल्लांना सोडून रहाणार्‍यांच्या
वेदना या जगाला कळत नाहीत.

साडीतली आई जीन्स मध्ये आली
तरी मायेचा पदर आटला नाही,
पिल्लांसाठी दाणा आणण्याचा
फेरा तिचा सुटला नाही.
मनाच्या बागेत साफसफाई
आता करायलाच हवी,
तण म्हणून वाढणार्‍या नात्यांना
त्यांची जागा दाखवायलाच हवी
प्रेमाची चारोळी वाचताना
क्षणभर मनात गोड गुदगुली होते,
आपल्यावरच लिहीली आहे की काय?
दुसऱ्या क्षणी शंका येते
तुझे प्रेम पाहून मनात
सुखावत असते मी,
पुन्हा पुन्हा तुझ्या
प्रेमात पडत असते मी..
समजेल तुझ्या डोळ्यातून
म्हणून टाळू नकोस मला,
मनात तुझ्या चाललयं काय
केव्हाच कळलंय मला.
दागिने घालून उगीच मिरवायची
हौस नाही रे मला,
तुझ्यासोबत सुखात आहे हे
नकळत दाखवायचंय त्याला
बहोत दुख होता है
तुम्हे अपना वादा तोडते देख,
क्या तुम्हें दर्द नहीं होता
हमारी नजरोंसें गिरते हुए?
काही प्रवास प्रवाहाच्या
विरुद्ध दिशेने असतात,
कळत असतं सगळं
तरी का संपू नयेसे वाटतात?
अवेळी आलेला पाऊस,
समुद्राचं उधाणलेलं रुप,
मनापासून सांगते
तुझी आठवण आली खुप.
फेसाळणाऱ्या समुद्रा सारखं
मोहक तुझं रूप
कधी असतोस उधाणलेला
कधी शांत खूप
माझा अख्खा जीव मी
तुझ्यावर ओवाळून टाकते,
तुझा थोडासा राग
मला ओवाळणीत देशील?
तुझ माझं नातं सुद्धा
समुद्रा सारखं असू दे,
भरती ओहोटी येऊन सुद्धा
आतून खोल हसू दे

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Dr. Gurunath : 94 22 43 4236, 73 50 80 2000
Dr. Gouri : 94 23 51 1070, 73 50 80 1000

Hospital : (02362) 236236, 236102, 236436
Back to content